
- इगतपुरी शहर भाजप व नागरिकांच्या आंदोलनाला मोठे यश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
इगतपुरी : तालुक्यातील गिरणारे गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी व्होल्टेजची समस्या आणि नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीविरोधात भाजपा इगतपुरी शहरचे शहर सरचिटणीस ॲड. मुन्ना पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. महावितरणने गिरणारे येथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसवून त्याचे अंतिम काम पूर्ण केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत भाजपा इगतपुरी शहरचे शहर सरचिटणीस ॲड. मुन्ना पवार यांनी नागरिकांसह महावितरण कार्यालयावर आंदोलन करत तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची जोरदार मागणी केली होती.
या आंदोलनानंतर महावितरण प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर केला आणि त्याचे अंतिम तांत्रिक कामही पूर्ण केले. त्यामुळे गिरणारे गावातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत व स्थिर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी ॲड. मुन्ना पवार यांनी सांगितले की, “भाजपा नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आली आहे. गिरणारे गावातील नागरिकांना दिलासा मिळावा, हा आमचा उद्देश होता. नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. यापुढेही जनतेच्या प्रत्येक समस्येसाठी आम्ही ठामपणे लढत राहू.”
ग्रामस्थांनीही नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्याबद्दल समाधान व्यक्त करत भाजपा इगतपुरी शहर, ॲड. मुन्ना पवार आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.
Comments are closed.