NGN News
Latest Marathi News

‘सावरकर आणि हिंदुत्व’ या विषयावर तीन दिवसीय व्याख्यान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

‘सावरकर आणि हिंदुत्व’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते योगेश सोमण यांचे विशेष व्याख्यान येत्या २८ ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, हिंदुत्वाची संकल्पना, राष्ट्रवाद तसेच सामाजिक विषयांवर मार्गदर्शन या व्याख्यानमालेतून करण्यात येणार आहे. श्री साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली येथे दररोज सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान होणार आहे.

हा विशेष कार्यक्रम नगरसेविका मयुरी अंकुश पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिक, युवक-युवती तसेच सावरकर विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.