
- ओळख लपवण्यासाठी आरोपीचे चक्क टक्कल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नीट परीक्षेचा पहिला पेपर शहरात फुटला आणि पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने संशयित शुभम खैरनार ( ३० वर्षे ) याला अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत. ओळख लपवण्यासाठी आरोपीने चक्क टक्कल केले होते, मात्र नाशिक पोलिसांच्या ‘बाझ’ नजरेतून तो वाचू शकला नाही.
राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तपासादरम्यान पोलिसांना त्याचे नाव मिळाले होते, मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.
पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले.
प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक
यासंदर्भातील धक्कादायक बाब म्हणजे 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली
Comments are closed.