NGN News
Latest Marathi News

पी.डी. गांगुर्डे सोशल ग्रुपतर्फे बौद्धपौर्णिमा साजरी; मान्यवरांची उपस्थिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : पी.डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व परिवार यांच्या वतिने बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने परित्राण पाठ सूत्रपठन हा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मंगलमय दिनी भगवान बुद्धांच्या करुणामय संदेशाने आपल्या हृदयांना शांती मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली.

माजी महापौर अशोकभाऊ दिवे, मोहनभाऊ अढांगळे, नगरसेविका सिमाताई पवार, नगरसेवक सचिन मराठे, नगरसेविका, नगरसेविका आशाताई तडवी, ज्योतीताई जोधंळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बौद्धचार्य महेश पगारे यांनी बुद्धवंदना घेऊन मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. या प्रसंगी समाजकल्याण महामंडळाचे जनरल मॅनेजर संतोष शिंदे, बाळासाहेब शिंदे, पी. डी काळे, दिनकर दाणी, शशिकांत उपासनी, धनंजय चतुर, डॉ. रवी सोनने, मिलिंद सजगुरे, श्रीपादजी कुलकर्णी, नानासाहेब शिलेदार, मनोज गोडसे, अनिल जोधंळे, विशाल पवार. योगेश नन्नवरे, आनिताताई भामरे, भारती पाटील, मिलिंद कुलकर्णी, शामभाऊ जाधव, रविंद्र कुलकर्णी, मिलिंद भालेराव, भालचंद्र जाधव, अशोक जोशी, सजंय देवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुपचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे, सेक्रेटरी दिपक कटारे, विजय अहिरे, संदीप गांगुर्डे, राजेश शेळके, सुशिल बर्वे, दत्ताभाऊ गांगुर्डे, गणेश कळमकर, सुधीर गायकवाड, लभिब मुल्ला, संजय खरे आदींनी प्रयत्न केले.

Comments are closed.