NGN News
Latest Marathi News

प्रतिभा चाकणकर हाजीर हो ! खरात प्रकरणी इडीकडून समन्स जारी

  • मनी लौंड्रीग संबंधित पाऊल; मुलगा तन्मय देखील रडारवर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा ह्या अखेर इडीच्या परिघात आल्या आहेत. चाकणकर यांच्यासह मुलगा तन्मय यांना इडीने समन्स बजावले असून पुढील आठवड्यात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लौंड्रीग प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे.

खरात याने १३४ हून अधिक बनावट खाती उघडून निधी वळवल्याचा संशय आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत ‘घोस्ट’ खात्याद्वारे तब्बल ७० कोटींचे संशयास्पद व्यवहार झाले. खरात याने भक्तांकडून केवायसी कागदपत्रे घेत त्यांच्या नकळत खाती उघडली. याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्था आणि नाशिक जिल्ह्यातील एका पतसंस्थेची चौकशी सुरु आहे. पैकी समता पतसंस्थेतील चार खात्यांतून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहेत. संबंधित खाती खरात याच्याशी जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या खात्यांत खरात यांना ‘नॉमिनी’ म्हणून दाखवण्यात आले आणि खाते उघडताना त्यांचा मोबाईल क्रमांक वापरल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी आपल्यावरील आरोप आधीच फेटाळले असून ही खाती आणि त्याच्याशी संबंधित स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, आता इडीचे समन्स आल्याने चाकणकर अधिकाऱ्यांना कसे तोंड देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.