NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या सराफाकडून महिला ग्राहकाचे २५ लाखांचे दागिने हडप

  • सतीश बेदमुथा यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जादा परताव्याचे आमिष दाखवून महिला ग्राहकाचे तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हडप केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सराफ बाजारातील मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफ या सराफी पेढीचे संचालक संशयित सतीश बेदमुथा यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, डोंबिवली (पश्चिम) येथील भाईरवाडी भागातील रहिवासी शिल्पा जयंत जोशी यांनी पेढीने जाहीर केलेल्या एका आकर्षक योजनेत आपल्याकडील सोने विश्वासाने ठेवले. त्यावर वर्षअखेरीस ४.५ टक्के वाढीव सोने व्याज म्हणून दिले जाईल, असे आमिष दाखवण्यात आले होते. जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून जोशी आणि त्यांच्या जाऊबाई यांनी अनुक्रमे १९८.५७० ग्रॅम आणि १३५ ग्रॅम असे एकूण ३३३. ५७० ग्रॅम सोने (अंदाजे किंमत २५ लाख रुपये) बेदमुथा यांच्याकडे सोपवले. तथापि, मुदत संपल्यानंतरही त्याने दोन्ही ग्राहकांना कोणतेही वाढीव सोने दिले नाही. मूळ सोन्याचे तुकडे परत न करता अपहार करून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिल्पा जोशी यांनी सरकाखाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

  

Comments are closed.