NGN News
Latest Marathi News

सुपर न्युमरोटा संघ पी. डी. नाना गांगुर्डे स्मृती चषक स्पर्धेचा विजेता

  • आय.एस.पी. पलटन संघ उपविजेता; स्पर्धेत सोळा संघ सहभागी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : गेली दहा वर्ष पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा फाऊंडेशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पी. डी. नाना गांगुर्डे स्मृती चषक 2026 सी.एन.पी व आय.एस.पी. प्रेस अंतर्गत भव्य क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेच्या आटीतटीच्या आंतिम सामा सुपर न्युमरोटा सी.एन.पी. व आय.एस.पी. पलटन यांच्यात होऊन सुपर न्युमरोटा संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धा आय.एस.पी. जिमखाना ना. रोड मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यात . या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला. या वर्षी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रोमहर्षक विजय मिळवून झाला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुपर न्युमरोटा सि.एन.पी संघाने पटकावले.

त्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आय.एस.पी. पलटन संघाने पटकावले, तसेच तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सी.एन.पी यांनी पटकावला. तसेच सामन्यातील मॅन ऑफ द सीरिज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅस्टमन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अशी पारितोषिके निवड केलेल्या खेळाडूंना देण्यात आली. या स्पर्धेसाठी आय.एस.पी. प्रेसचे मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुद्रे, राजेश टाकेकर, रामभाऊ जगताप, सगुणा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले. यावेळी सामन्यातील सूत्रसंचालक अविनाश देवरुखकर व सुनील नाईक यांनी केले,

स्कोअरर रवी शिरसाठ यांनी तर समलोचन राजू पवार व प्रकाश सोनवणे यांनी केले. प्रमुख पाहुणे जिमखाना चेअरमन राजेश चमोली, प्रवीण बनसोडे, कार्तिक डांगे, दीपक कटरे, कुणाल गायकवाड, मोहन रावळे, शरद काळे, विजय अहिरे, राजेश शेळके, उत्तम तेजाळे, सुधीर गायकवाड, आय. एस. पी प्रेसचे सर्व गणेश कळमकर, प्रज्वल गांगुर्डे, प्रद्युन्य गांगुर्डे व सी.एन.पी. आय.एस.पी कमिटी प्रतिनिधी व कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन स्पर्धेचे आयोजक संदीप गांगुर्डे व दत्ता गांगुर्डे यांनी मानले.

Comments are closed.