NGN News
Latest Marathi News

बालाजी जेम्स, ज्वेल्स एंड डायमंड्स पेढी नाशकात दाखल

  • अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर नाशिक शाखेचा थाटात शुभारंभ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : आपल्या सचोटी आणि पारदर्शी व्यवहारासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत व्यावसायिक भरारी घेतलेल्या श्री बालाजी जेम्स, ज्वेल्स एंड डायमंड्स या सराफी पेढीच्या नाशिक शाखेचा औपचारिक शुभारंभ रविवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर थाटात पार पडला. नाशिक शहराचा वाढता व्यावसायिक परीघ लक्षात घेवून हा विस्तार करण्यात आल्याची माहिती संचालक भुतडा परिवाराच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमधील प्रशस्त दालन सुयोजना अपार्टमेंट, पाटील प्लाझासमोर , वीसे मळा, कॅनडा कॉर्नर येथे साकारण्यात आले आहे. शुभारंभी सोहळ्याप्रसंगी कैलास भुतडा, सौ.रेखा भुतडा, गोपाल भुतडा, सौ.वंदना भुतडा, जगदीश राठी, सतीश धूत, श्याम भुतडा, सौ.मंजुषा भुतडा, सौ.जया धूत, सौ शारदा धूत,सूरज काबरा,इंटेरियर आर्किटेक्ट सौ.पूजा काबरा, जयप्रकाश लाहोटी, वल्लभ धूत, वेदमूर्ती वामन गुरु गायधनी, उमाशरण मिश्रा यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या दालनात सर्व प्रकारचे रत्न, सुवर्णालंकार, हिरे दागिने, चांदीचे अलंकार आणि उपकरणे उपलब्ध राहणार आहेत. नाशिककरांनी दालनास भेट देण्याचे आवाहन भुतडा परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.