NGN News
Latest Marathi News

ओझरला उद्या विराट हिंदू संमेलन; धर्मजागृतीचा देणार संदेश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अमर आढाव
ओझर शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने “विराट हिंदू संमेलन १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. धर्मजागृती, सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक बंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा सोहळा पार पडणार असून, परिसरात याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओझर येथील भगवा चौक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या हिंदू संमेलनात प्रसिद्ध हिंदू व्याख्यात्या कु. हर्षाताई ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून धर्म, संस्कृती आणि वर्तमान सामाजिक परिस्थिती यावर भाष्य होणार असून उपस्थितांना त्यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जय बाबाजी भक्त परिवारातील ज्येष्ठ संत श्री महंत १०८ स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज,देवभूमी जनशांती धाम येथील शि. भ. प. हृदयानंद माऊली महाराज यांसह अनेक साधू संत,मान्यवर यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी संतांचेही मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. विराट हिंदू संमेलन रविवारी दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भगवा चौक, ओझर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी सकल हिंदू समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून समाजात एकात्मतेचा संदेश देत धर्म आणि संस्कृतीच्या जतनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात येणार आहे.

Comments are closed.