NGN News
Latest Marathi News

 भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये उतरते तेव्हा..

  • पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे घडला प्रकार; सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह

** एनजीएन न्यूज नेटवर्क

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान ही मोठी चूक झाली. मंत्री भुजबळ सुरक्षित असले तरी प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, भुजबळ हे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी खानवडी येथे येत होते. तथापि, नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवले. यामुळे म्होथा गोंधळ उडाला. पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने तिथेच लँडिंग केले. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले.  भुजबळ यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले 

Comments are closed.