NGN News
Latest Marathi News

‘महावीर भगवान कि जय’ जयघोषाने घोटी नगरी दुमदुमली

  • शेकडो समाजबांधव तसेच महिला व युवती व युवकाचा सहभाग 

** राहुल सुराणा

घोटी : एनजीएन न्यूज नेटवर्क

अहिंसा, शाकाहार, आणि “जियो और जिने दो” हा मानवता पूर्ण संदेश देणारे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची २६२५ व्या जयंती निमित्त “महावीर भगवान कि जय” अश्या घोषणा देत उत्साहाच्या वातावरणामध्ये घोटी शहरात सकल जैन समाजातर्फे उत्साहात साजरी करण्यात आली .भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी सर्व समाज बांधवानी उपस्थिती लावली. 

            सुशोभित केलेल्या रथामध्ये जैन मंदिर , जैन स्थानकमार्गे , मारुती मंदिर , तेली गल्ली, भंडारदरा रोड येथून जुना आग्रा रोड मार्गे जैन भवन पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याप्रसंगी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते हि मिरवणूक शहरातील विविध मार्गक्रमण करिता जैन भवन येथे पोहचली. मिरवणुकीत सहभागी झालेले पुरुष वर्ग सफेद वस्त्र, व पंचरंगी दुपट्टा परिधान करून तसेच महिला वर्ग चुनरी रंगीत साडी परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण मिरवणुकीत शिस्तबद्ध व आकर्षक स्वरूपात साजरी झाली. 

           शहरात विविध संस्थांच्या वतीने भगवान महावीराना अभिवादन करण्यात आले. संताजी मंगल कार्यालय जवळ घोटी शहर शिवसेना प्रमुख गणेश काळे यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व तसेच घोटी मर्चंट बँक व जनसेवा पतसंस्थेच्या वतीने भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिका-यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिति लावली. घोटी शहरातील जैन मंदिर येथून भगवान महावीर यांच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक व शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीर स्वामी की जयजयकार करत शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती . शहरातिल सामाजिक कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी भगवान महावीर यांना अभिवादन केले. जैन भवन येथे हजारो उपस्थितानि महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर माजी आमदार शिवराम झोले, माजी जी प सदस्य उदय जाधव, ज्येष्ठ नेते निवृत्ती जाधव, सौ अलका जाधव, मारुती मंदिर विश्वस्त मंडळ, माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान जाधव, गणेश काळे, विठ्ठल काळे, अनिल काळे, दीपक साखला, दिपा कंदकुरीवार आदी स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले.

         जैन भवन येथे झालेल्या व्याख्यानात प्रसिद्ध वक्ते आनंद बंब यांनी वर्तमान मे वर्धमानकी आवशकता या विषयावरती अंत्यंत समर्पक, सखोल विचार मांडले, आज सुरू असलेल्या धकाधकीच्या जीवनाच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीर यांचे विचार अत्यंत प्रभावशाली पद्धतीने सर्वांसमोर मांडले. तसेच भगवान महावीर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान दिले. तसेच या प्रसंगी झालेल्या रक्तदानं शिबिरामध्ये तरुण वर्गासह महिलांनी मोठ्या उत्साहात रक्तदानं केले, यारिया ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 94 पिशव्यांचे संकलन करण्यात आले . घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

        याप्रसंगी जैन समाजाचे संघपती नंदकुमार शिंगवी समवेत संघ कार्यकारणी, राईस भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चोरडिया समवेत भगर व तांदूळ उत्पादक व विक्रेते तसेच सुरेश पिचा , सुरज शहा, संदेश मेहता, डॉ. कुबेर उपाध्ये , सुनील पहाडिया, घोमको उपाध्यक्ष सौ.नीलम कुमठ, सौ .वैशाली लुणावत, घोमको संचालक दिपक चोरडिया, सचिन लोढा, जनसेवा चेअरमन तुषार बोथरा, अभय बोथरा , हेडगेवार पतसंस्थेचे  बाळासाहेब सुराणा, भाजपचे प्रफुल कुमठ,  सुनील धोका, उमेश भन्साळी, ताराचंद कुमठ, सुनील गुगळे, डॉक्टर ब्रम्हेचा, अभिजीत देसरडा, तुषार भन्साळी, दीपक पारख, अशोक पिचा आदी समाज बांधव उपस्थित होते. सूत्र संचालन ईश्वर चोरडिया यांनी केले. 

       महावीर जन्म कल्याणाक महोत्सव निमित्ताने ३० मार्च सोमवार रोजी भक्ती संगीत आयोजित करण्यात आले होते. त्यात ऋषभ व संभव जैन यांच्या सुमधुर आवाजात भगवान महावीर यांचे भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सर्व कार्यक्रम साठी सर्व स्तरावर जय महावीर ग्रुपच्या सर्व जैन युवकांचा त्यात तुषार चोरडिया, केतन नाबेडा, विशाल पिचा, निखिल गोठी, सुयश कुमठ, दीक्षित शाह आदी यांचा सहभाग लक्षणीय होता.

Comments are closed.