
- मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून अवमान केल्याबद्दल याचिका
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे अडचणीत आले आहेत. मनसेचे नाशिक महानगरप्रमुख सुदाम कोंबडे यांनी दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची पुढची सुनावणी 7 एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीला निशिकांत दुबे यांनी स्वतः हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
‘मराठी माणसाला पटक-पटक के मारेंगे’ असे वादग्रस्त विधान दुबे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. दुबे यांच्या या विधानाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत चोख प्रत्युत्तर दिले होते. निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आले, तर त्यांना इथे ‘डुबा-डुबा के मारेंगे’, असा प्रति-इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. या वादानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मनसेच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा न्यायालयीन स्तरावर करण्यात आला. मनसेचे नाशिकमधील नेते सुदाम कोंबडे यांनी दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मनसेच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा न्यायालयीन स्तरावर करण्यात आला. मनसेचे नाशिक शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
निशिकांत दुबे सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अपमान करतात. म्हणूनच यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आता आम्ही दुबेला दाखवू की, कसे पटक पटक के मारते हैं. तू नाशिकला ये. हा माणूस खासदार असला तरी त्यांना अभ्यास कमी आहे. म्हणून दुबे, तुला धडा शिकवावा लागेल, असा इशारा कोंबडे यांनी दुबेंना याचिका दाखल करतेसमयी दिला होता.
Comments are closed.