
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अमर आढाव
जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनागिरीजी) महाराज यांनी जीर्णोद्धार केलेल्या जातेगाव (ता.नांदगाव) येथील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित वार्षिक जपानुष्ठान सोहळ्याची सांगता अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात झाली.
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी सुरू केलेली आध्यात्मिक परंपरा आजही उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने अखंडपणे सुरू आहे.जातेगाव येथे प्रतिवर्षी होणारा जपानुष्ठान सोहळा याहीवर्षी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या धर्म सोहळ्यात भक्ती, शिस्त आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. उपस्थित भाविकांना जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी विशेष मार्गदर्शन केले. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने
महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप व जपानुष्ठानात सहभाग नोंदविला.
अनुष्ठान करणाऱ्या साधकांच्या मौनव्रताची सांगता जय बाबाजी, ‘जय पिनाकेश्वर’ अशा जयघोषात झाली. हवेवर जपानुष्ठान करणाऱ्या साधकांना जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी स्वतः तीर्थ देऊन त्यांच्या व्रताची सांगता केली. यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.चैतन्य, श्रद्धा आणि भक्तीने नटलेला हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
Comments are closed.