NGN News
Latest Marathi News

सहावीतील विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला; विधिमंडळात उमटले पडसाद

** एनजीएन न्यूज नेटवर्क

संगमनेर : सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात अलायची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेत घडली. हल्लेखोर आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेचे थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळाले.

प्राप्त माहितीनुसार, वडगाव पान शाळेमधील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले आहे. यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एका युवकाने  तिच्या चेहऱ्यावरती अॅसिड फेकले. मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले.  या घटनेची माहिती पोलीस  घटनास्थळी दाखल झाले. अॅसिड फेकणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.

विधिमंडळात संताप व्यक्त

घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत, लवकरच आरोपी पकडला जाईल, असे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. 

Comments are closed.