- जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम; महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून सहभाग नोंद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील समर्थ गुरुपीठात जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या भव्यदिव्य महिला मेळाव्यात महाराष्ट्रातून व इतर राज्यांमधून आलेल्या 9000 भगिनींनी हजेरी लावली आणि दिवसभरातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण केली. याप्रसंगी गुरुपिठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे,डॉ अपर्णा देशमुख, डॉ वैशाली महाजन, दीक्षा मोरे, सोनाली तेलंग व इतर मान्यवर उपस्थित होते.
सकाळी महाआरती झाली यानंतर आलेल्या सर्व भगिनींनी श्री दुर्गा सप्तशती पठण केले तदनंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. मेळाव्यात उपस्थित भगिनींशी संवाद साधताना चंद्रकांतदादा मोरे म्हणाले की आज भारतीय संस्कृतीचा हेवा संपूर्ण जगास वाटतो आहे परंतु ही संस्कृती टिकवून ठेवण्यात आमच्या माता भगिनींनी मोठे योगदान आणि त्यागाची भूमिका स्वीकारलेली आहे.महिलांना अध्यात्मिक सामाजिक,आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी सेवा मार्ग अखंडितपणे विविध कार्यक्रम उप क्रमांची राबवित असून सद्गुरु मोरेदादा आणि गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी महिलांना सेवा मार्गात कायम प्राधान्य दिले आहे.आज भगिनी विविध क्षेत्रात शिखरावर विराजमान असून ही घोडदौड कायम टिकवून ठेवण्यासाठी तिने कायम अद्ययावत राहणे गरजेचे आहे.
सायबर गुन्हे शाखेच्या अधिकारी दीक्षा मोरे यांनी महिलांना सायबर गुन्ह्यापासून कसा बचाव करावा याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.स्वसंरक्षण महिलांविषयी कायदे,दामिनी पथक, गुन्हा घडल्यास नेमके काय करावे हे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले.डॉ वैशाली महाजन यांनी योगासने तर डॉ अर्पणा देशमुख यांनी महिलांचे लहान मोठे आजार तर मानसोपचार तज्ञ सोनाली तेलंग यांनी व्यसनमुक्ती, मानसिक ताण तणाव,कौटुंबिक अत्याचार याबाबत मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात जिजाऊ,सावित्रीबाई, झाशीची राणी,मीराबाई अहिल्याबाई यांचे पोशाख परिधान करून आलेल्या चिमुरड्या मुलींनी सर्वांची शाबासकी मिळविली.
यानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचा 800 महिलांनी लाभ घेतला तर 72 जणींनी रक्तदान सुद्धा केले.
Comments are closed.