NGN News
Latest Marathi News

‘जीएसटी’ ची जोडगोळी ‘एसीबी’ जाळ्यात; व्यापाऱ्याकडे ‘इतक्या’ रकमेची मागणी

  • दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : कर भरणी प्रक्रियेत अनियमितता आढळलेल्या व्यापाऱ्याकडे तब्बल सव्वा कोटींची लाच मागितल्याचा प्रकार जीएसटी कार्यालयात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकारी तडजोडीतील काही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) जाळ्यात सापडले आहेत. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नाशिकमधील एक व्यापारी कर भरण्याच्या प्रक्रियेत दोषी आढळल्यानंतर जीएसटी विभागाने त्याला त्यासंबंधी नोटीस बजावली. मोठ्या कारवाईच्या भीतीपोटी व्यापाऱ्याने अधिकाऱ्यास तडजोडीचा प्रस्ताव दिला. त्यासाठी एका खासगी मध्यस्थाला गाठून व्यापाऱ्याकडे सव्वा कोटी रकमेचा लकडा लावण्यात आला. तथापि , ही रक्कम जास्त होत असल्याचे सांगून व्यापाऱ्याने मध्यस्थाला गळ घालण्याचा प्रयत्न करून ते प्रमाण वीस लाखांवर आणण्यात यश मिळवले. दरम्यान, व्यापाऱ्याने थेट मुंबईस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) कडे तशा आशयाची तक्रार नोंदवली. तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी दुपारी जीएसटी कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सूत्रांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले उपायुक्त आणि सहायक उपयुक्त दर्जाचे अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकाराने जीएसटी तसेच व्यापारी विश्वात खळबळ उडाली आहे.

Comments are closed.