- दिल्लीच्या रणांगणात महाराष्ट्राचा जयघोष !
- 30 खेळाडूंनी सुवर्ण-रौप्य-कांस्य पदकांची बरसात करत देशभरात डंका वाजवला
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय टेंगसुडो (कोरियन कराटे मार्शल आर्ट्स) स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आक्रमक, आत्मविश्वासपूर्ण आणि वर्चस्वपूर्ण खेळ करत संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप उमटवली.या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धेत
राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल,पिंपळनेर येथील खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकावला. देशभरातून आलेल्या बलाढ्य खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघाकडून सहभागी 30 खेळाडूंनी सुवर्ण,रौप्य व कांस्य पदकांची अक्षरशः बरसात करत राजे छत्रपती स्कूल ही संस्था आज राष्ट्रीय मार्शल आर्ट्स क्षेत्रातील एक सशक्त ताकद बनल्याचे ठणकावून सांगितले.
महाराष्ट्राच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब
अजय गावडे,साजन चौरे,सुधांशू पाटील, सुमित जगताप, सुरज पाटील,सिद्धेश माळी, कामिनी बागुल, पूनम सूळ,राणी चौधरी,मयुरी ठाकरे,साद तांबोळी, कृष्णा कुंभार,गायत्री अहिरे,सिद्धिका पाटील, विजय भील,मनोज भदाणे,निर्मल सोनवणे व रचना बहिरम या खेळाडूंनी सुवर्ण पदके पटकावत स्पर्धा एकतर्फी बनवली आणि महाराष्ट्राच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले.
रौप्य-कांस्याने बळकट केले यश गोकुळ चौरे, हिमांशू पाटील,कृष्णा सरडान, मयूर राठोड,स्वामी साबळे,प्रणव पाटील, हेमंत पाटील व हिना भोये यांनी रौप्य व कांस्य पदकांवर आपले नाव कोरले. तसेच दर्शन धामणे व साई सरडान यांनी कांस्य पदक जिंकून संघाच्या यशात मोलाची भर घातली.
राष्ट्रीय पातळीवर संस्थेची दहाड
या दणदणीत विजयामुळे राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आली आहे.खेळाडूंचा आक्रमक खेळ, तांत्रिक कौशल्य आणि विजयी मानसिकतेचे देशभरातून कौतुक होत आहे. पालक,क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांनी या कामगिरीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
व्यवस्थापनाचा पाठिंबा, प्रशिक्षकांची रणनिती
या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजे संभाजी शिवाजी अहिरराव,सचिव राणा पाटील,संचालक श्याम कोठावदे व जगदीश ओझरकर तसेच मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.ही केवळ पदकांची नव्हे, तर शिस्त, संघर्ष आणि जिद्दीची विजयगाथा असल्याचे त्यांनी सांगितले. या यशामागे संभाजी अहिरराव, अमोल अहिरे, बाळासाहेब गायकवाड व बहिरम सर यांचे कठोर प्रशिक्षण, आक्रमक तयारी व सातत्यपूर्ण मार्गदर्शन निर्णायक ठरल्याचे नमूद करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय क्षितिजाकडे झेप दिल्लीतील या विजयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. राजे छत्रपती स्कूल ही संस्था आता केवळ राज्य वा राष्ट्रीयच नव्हे,तर आंतरराष्ट्रीय चॅम्पियन घडविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. महाराष्ट्राच्या मातीतील हे खेळाडू भविष्यात जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करतील,यात शंका नाही.
Comments are closed.