NGN News
Latest Marathi News

दिंडोरीजवळ स्कार्पिओ- ईरटीगा भीषण अपघातात ४ जण ठार

  • ओव्हरटेक करताना धडक ; 6 जण जखमी; 4 जणांची प्रकृती गंभीर

दिंडोरी : एनजीएन न्यूज नेटवर्क

गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण शिवारात चाचडगाव टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओने पेठ कडून येणाऱ्या ईरटीगा कारला ओवरटेक करताना समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव दमणच्या सिलवासा येथुन ईरटीगा गाडी पेठकडुन नाशिककडे येत असताना नाशिक कडून पेठकडे जाणाऱ्या स्कार्पिओने चाचडगाव टोल नाक्याजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना समोरुन धडक दिल्याने ईरटीगामधील तीन जण जागीच ठार झाले. त्यामध्ये शाहरुख खान फराकत खान ( 28 ) राहणार सिल्वासा (बाकी दोघांचे नावे कळू शकले नाही.) तर स्कार्पिओ मधील चोगिलाल हिरालाल गुजर वय (75) राहणार देवगड जिल्हा राजस्थान हे जागीच ठार झाले असून जखमीं किसनलाल हिरालाल गुजर वय (45 )गणेशा किसनलाल गुजर वय (42 )खुशी किसनलाल गुजर वय (१२ )पुनम गुजर वय( 20) ( सर्व राहणार जिल्हा राजगड, राजस्थान) यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

घटनास्थळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस नाईक संजय गायकवाड, पीएसआय खुळे,पोलीस हवालदार पानसरे,पी.सी जोपळे,महामार्ग पोलीस पी एस,आय दीपक दौडे,सहायक पोलीस निरीक्षक मीरा अदमान, पोलीस हवालदार बोडके, पोलीस नाईक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल शेख ढगे,मसदे यांनी धाव घेत मदत कार्य करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

रस्ता रुंदीकरणासह डिव्हायडर लावण्याची मागणी

नाशिक पेठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे ,चाचडगाव पासून पुढे नेहमीच अपघात होत असतात याकडे राष्ट्रीय महामार्गवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची रुंदी वाढवून डिव्हायडर लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे, असेच अपघात होत राहीले तर आंदोलन करण्याचा इशारा चाचडगाव परिसरातील नागरिकांनी दिला आहे

Comments are closed.