NGN News
Latest Marathi News

नववर्षारंभी श्री स्वामी समर्थ केंद्रांवर हजारोंची उपस्थिती

  • गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी चढाओढ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

2026 च्या प्रारंभी आज सर्वच श्री स्वामी समर्थ केंद्रात आबालवृद्ध सेवेकरी, भाविक आणि नागरिकांनी दिवसभर गर्दी केली. नववर्षाच्या प्रथम दिनी श्री स्वामी महाराज आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी चढाओढ लागली.

येणाऱ्या नवीन सालात गुरुमाऊली आणि महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आज दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह देशभरातील सर्वच समर्थ केंद्रात लाखोंनी हजेरी लावली. दिंडोरी येथील दरबारा बुधवारी रात्री पासूनच गर्दीने फुलून गेला. आज वर्षाच्या प्रथम दिनी योगायोगाने गुरुवार आल्याने दुग्धशर्करा योगच आला आणि आज दिंडोरी प्रधान केंद्रासह सर्वत्र विक्रमी गर्दी झाली. दिंडोरीत स्वतः गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थितांशी चाळीस मिनिटे हितगुज केले आणि नववार्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.