NGN News
Latest Marathi News

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या निकेतन शिंदे याची नेत्रदीपक कामगिरी

  • १४ वर्षांखालील गटात सांघिक गटात सुवर्णपदक

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

६९ व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत नाशिकच्या निकेतन शिंदे याने नेत्रदीपक कामगिरी नोंदवत सांघिक गटात सुवर्णपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत देशभरातील १८ राज्यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र संघाने प्रभावी कामगिरीचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील गटात राष्ट्रीय स्तरावर निकेतन शिंदे याची प्रथमच निवड करण्यात आली होती. क्रीडा आणि युवा संचालनालय आणि लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे नोव्हेम्बरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे अनिकेत याची राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. १४ वर्षांखालील गटात महाराष्ट्रातील चार खेळाडू निवडले गेले होते. त्यामध्ये मुंबईचे तिघे आणि नाशिकच्या निकेतन याचा समावेश राहिला. दरम्यान, राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णवेध करणाऱ्या निकेतन याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments are closed.