नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित शालेय राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघात नाशिकच्या स्वरा करमरकर हिची निवड करण्यात आली. तिच्यावर महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धा पेरांबलूर (तामिळनाडू) येथे होणार आहेत. महाराष्ट्र संघात स्वरा करमरकर शिवाय रुचिता धारवटकर (पुणे), अन्वी करंबळेकर (ठाणे), अनिशा पात्रा (रायगड) व सई कुलकर्णी (पुणे) यांचा समावेश आहे. स्वरा प्रशिक्षक जय मोडक आणि पुनीत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
तिच्या या निवडीबद्दल जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी व मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.