NGN News
Latest Marathi News

सदनिका प्रकरण भोवले; माणिकराव कोकाटे मंत्रिपदावरून पायउतार

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी अपेक्षेनुसार मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत राजीनामा मंजूरही केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. 

माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते.  कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.