** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील राजे छत्रपती इंग्लिश मीडियम मार्शल आर्ट स्कूलमध्ये साक्री तालुक्यातील भामेर येथे 16 व 17 डिसेंबरला होणाऱ्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा,हा उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रत्येक शाळेतून चार उत्कृष्ट प्रकल्पांची निवड केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव रा. ना.पाटील,चेअरमन संभाजी अहिरराव,जगदीश ओझरकर,मुख्याध्यापिका सोनाली पाटील व शिक्षक उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्प सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.यामध्ये वनस्पतींचे भाग,पवनचक्की, गणितीय प्रकल्प,होलोग्राम, पर्यावरण व जलसंवर्धन, चंद्रयान-3,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सौर ऊर्जा, हायड्रोइलेक्ट्रिक धरण,वेस्ट वॉटर ट्रीटमेंट,सोलर इरिगेशन,ऊर्जा संवर्धन, लाय-फाय तंत्रज्ञान आदी विषयांचा समावेश होता.
मुख्याध्यापिका सोनाली पाटील म्हणाल्या,विज्ञान ही निरीक्षण,प्रयोग व विश्लेषणातून सत्य शोधण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया आहे.विज्ञानामुळे दैनंदिन जीवन अधिक सुलभ,सुरक्षित व प्रगत झाले आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांकाची चिंता न करता विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
Comments are closed.