
** अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क
येथील रुपेश बधान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्ष बी. फार्मसीच्या विद्यार्थिनींनी सेमिस्टर परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अमृता विलास कोठावदे हिने प्रथम क्रमांक,स्नेहा शंकर नरोडे हिने द्वितीय क्रमांक,तर अश्विनी यशवंत बिलकुले हिने तृतीय क्रमांक पटकावून संस्थेचा मान उंचावला.
सदर विद्यार्थिनींना प्रा.आर. टी.जाधव,ए.एस.दशपुते, एच.आर.महाजन,पी.एस. बागुल आणि संदीप पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे सचिव रुपेश बधान यांनी विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.यावेळी प्राचार्य निलेश महाजन , प्राध्यापक गणेश अहिरे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.