NGN News
Latest Marathi News

बागलाणमधील खमताणे येथे नऊ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाकडून अत्याचार

  • पैसे, चॉकलेट असे आमिष; सटाणा पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा

सटाणा : एनजीएन न्यूज नेटवर्क

एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर 75 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना बागलाण तालुक्यात उघड झाली आहे. अल्पवयीन बालिकेला पैसे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकाराबद्दल संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सदर घटना बागलाण तालुक्यातील खमताणे येथे घडली आहे. नामदेव हरी गुंजाळ असे या नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नराधम वृद्ध बालिकेवर अत्याचार करीत होता. रविवारी दुपारी त्याने तसाच प्रकार केल्यानंतर बालिकेला त्याने हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या बालिकेने घरी आल्यावर झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. संबंधित वृद्धाच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात येवून नराधमाला कडक शासन करण्याची मागणी केली.

Comments are closed.