NGN News
Latest Marathi News

दिंडोरीतील डॉक्टरला ३.६४ कोटींना ऑनलाईन गंडा

  • शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर अधिक नफा आणि परतावा मिळवून देण्याच्या आमिषातून दिंडोरीतील एका डॉक्टरला तब्बल ३.६४ कोटी रुपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात एका संशयितास मध्य प्रदेश मधून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती ग्रामीण सायबर पोलिसांनी दिली.

अखलाख रईस शेख असे संशयिताचे नाव असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवल्यानंतर डॉक्टरने मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने ग्रामीण सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर मध्य प्रदेशातील नागोर येथे संशयिताच्या खात्यात दीड कोटींची रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून शेख यास ताब्यात घेतले आहे. संशयिताने सायबर गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करून कमिशन स्वतःच्या बँक खात्यात मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.