NGN News
Latest Marathi News

आंतरजिल्हा, राज्य अजिंक्यपद स्पर्धांसाठी जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर

  • उद्यापासून बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे स्पर्शाचा शुभारंभ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित ५४ व्या आंतरजिल्हा व ८७ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी नासिक जिल्हा टेबल टेनिस संघाची निवड करण्यात आली. संघाची घोषणा नरेंद्र छाजेड व शेखर भंडारी यांनी केली. या संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून पुनीत देसाई यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे दि. २५ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारा राज्याचा टेबल टेनिस संघाची निवड या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे करण्यात येणार आहे.
निवड करण्यात आलेला संघ खालीलप्रमाणे 

१५ वर्षाखालील मुले 

१) विहान मेघानी   २) अवि मोदी  ३) ओम रेडेकर  ४) यश भंडारी 

१५ वर्षाखालील मुली 

१) शर्वरी कसबे  २) स्वधा वाळेकर   ३) धनिका पवार  ४) ओवी रहाणे 

१७ वर्षाखालील मुले १) अर्चित राहणे  

२) अवि मोदी  ३) विआन मेघाणी 

१७ वर्षाखालील मुली 

१) शर्वरी कसबे  २) स्वधा वाळेकर  ३) धनिका पवार  ४) ओवी रहाणे 

१९ वर्षाखालील मुले 

१) अर्चित राहणे  २) पियुष पारखे  ३) साईप्रसाद पाटील  ४) अविश केवलरामाणी 

१९ वर्षाखालील मुली 

१) स्वधा वाळेकर  २) धनिका पवार  ३) उम्मेहानी दागिनावाला 
या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष व निवड समिती सदस्य शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, शेखर भंडारी, जय मोडक, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी, अजिंक्य शिंत्रे. पुरुषोत्तम आहेर आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.