- नाशिकचे आशिष नहार यांना प्रदर्शन सचिव होण्याचा मान
नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क
इंडियन आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे दिल्लीत आयोजित तेराव्या आईस्क्रीम प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला. यशोभूमी, नवी दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन क्वालिटी ग्रुप चे राजीव खन्ना यांच्या हस्ते पार पडले. सदर प्रदर्शन दक्षिण आशियातील सर्वात मोठे आईस्क्रीम उद्यागाशी निगडीत प्रदर्शन ठरले. दि. ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान ते पार पडले.
या प्रदर्शनात २१ देशातील २५० पेक्षा जास्त आईस्क्रीम उद्योगाशी निगडीत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. तीन दिवसांत पंचवीस हजार पेक्षा जास्त व्यक्तींनी यावेळी भेट दिल्याची माहिती प्रदर्शन सचिव तथा ‘ निमा; चे अध्यक्ष आशिष नहार यांनी दिली. यामध्ये देश- विदेशातील नागरिकांचा समावेश होता.
या ठिकाणी आईस्क्रीम मशीनरी, आईस्क्रीमसाठी लागणारे कच्चा माल, डीपफ्रिजर्स, कोल्ड स्टोअरेज, पैकेजिंग मशीनरी व इतर अत्याधुनिक प्रणालीसह विविध प्रकारचे उपकरणे प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. प्रदर्शनाने आईस्क्रीम उत्पादन प्रक्रिया नवीन आयाम गाठल्याचा दावाही नहार यांनी केला.
याप्रसंगी आयसीएमए चे अध्यक्ष सुधीर शाह, सचिव आशिष नहार, राजेश गांधी, प्रदीप पाई, चरणजीत सिंह, अनुव्रत पब्राई, गिरीश पाई, बालराजू, नरसिम्हन सह देशविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी एम्स इवेंटचे संचालक फिरोज नक्वी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments are closed.