NGN News
Latest Marathi News

सुमती कानिटकर स्मृत्यर्थ आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आरोग्य मानव’ स्ल्कप्चर

  • कानिटकर दांपत्यातर्फे दहा लाखांची देणगी

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आवारातील ’आरोग्य मानव’ उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पासाठी श्रीमती सुमती कानिटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या षट्चक्र योग मुद्रेकरीता ले¶ट. जनरल राजीव कानिटकर (निवृत्त) आणि कुलगुरु ले¶ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी दहा लक्ष रुपये निधी विद्यापीठास देणगी स्वरुपात उपलब्ध करुन दिला आहे.

कुलगुरु ले¶ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून आरोग्य मानव प्रकल्प साकारण्यात आला आहे. मानवी अवयवांकरीता आवश्यक औषधी वनस्पती व त्यांचे महत्व सर्वांना समजावे या दृष्टीकोनातून विद्यापीठ परिसरात ’आरोग्य मानव’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे.’आरोग्य मानव’ च्या नाभीजवळ ज्ञानमुद्रेतील मानवी मूर्ती बसवली असून त्यामध्ये षट् चक्र दर्शविण्यात आले आहेत.

आध्यात्मिक ऊर्जेच्या महत्वाचे प्रतीक

यामध्ये मानवाच्या पंचंद्रिय अवयवानुसार कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ आदी अवयवांच्या आकारात त्या-त्या अवयवकरीता उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या स्लकप्चरच्या प्रतिमेची उंची १३ फूट आहे. ही प्रतिमा केवळ एक कलाकृती नसून ती भारतीय योगशास्त्र आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या महत्वाचे प्रतीक आहे. योग साधनेतून उन्नतीचा संदेश देणारे शिल्प आहे. सभोवताली सायकल ट्रॅक, ऑम्पी थिएटर, जलाशय व आयुर्वेदीक वनस्पतींची माहिती समवेत पर्यटन यांचा संगम याप्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.  

Comments are closed.