NGN News
Latest Marathi News

वाढत्या गुन्हेगारीवर अंतर्गत बदल्यांचा उतारा; डझनभर अधिकाऱ्यांचे खांदेपालट

आयुक्त संदीप कर्णिक यांचा निर्णय

नाशिक : वाढती गुन्हेगारी, खुनांची मालिका आणि एकूणच पोलीस खात्यावरील सर्वंकष रोष लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आणखी एक धडाडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहर आयुक्तालयांतर्गत डझनभर पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्द्ल्या करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर कड यांना गंगापूर पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाण्याचे वपोनि जगवेन्द्रसिंग राजपूत यांना अंबड पोलीस ठाणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वपोनि प्रकाश अहिरे यांना सातपूर ठाणे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष नरोटे यांना एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाणे, आडगाव पोलीस ठाण्याचे वपोनि संजय भिसे यांना सायबर विभाग, सातपूर पोलीस ठाण्याचे वपोनि रणजीत नलावडे यांना विशेष शाखा, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वपोनि तृप्ती सोनावणे यांना शहर वाहतूक शाखा या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. नवनियुक्त अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिककरांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न?

गेल्या सहा महिन्यात शहरात खुनांची मालिका सुरु आहे. या काळात चाळीसपेक्षा अधिक खून पडल्याच्या घटना घडल्यानंतर सर्वपक्षियांनी कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवत पोलीस खात्याला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नाशिक पोलिसांबाबत तक्रारी गेल्या. त्यानंतर आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बदलीसत्र राबवून नाशिककरांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहे.

Comments are closed.