NGN News
Latest Marathi News

खुनाचे सत्र अव्याहत; नाशिक रोडला धारदार शस्त्रांनी युवकाला संपवले

  • गोरेवाडी परिसरात दांडिया सुरु असताना थरार; पोलिसांकडून चौघांना बेड्या

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरातील खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. जुन्या वादाचे निमित्त करून दांडिया खेळणाऱ्या युवकाची गुरुवारी ( दि. २ ) रात्री धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना गोरेवाडी परिसरात घडली. कृष्णा ठाकरे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. दांडिया खेळणाऱ्या कृष्णा ठाकरे याच्याशी जुना वाद उकरून चौघांनी वाद घेतला. वादाचे पर्यवसान जोरदार भांडणात होवून चौघांनी कृष्णावर कोयत्यासह धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, याप्रकरणी तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी सापळा रचत मोईन शेख, मोगली बारसे, यश बारसे आणि आशु बारसे यांना ताब्यात घेतले. कृष्णाचा या चौकडी सोबत जुनावाद नेमका काय होता, याचा पोलीस तपास करीत आहेत.

Comments are closed.