इशान खांडेकर, नायशा रेवासकर विजेते
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
केशिका पुरकर चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीचा पुण्याचा इशान खांडेकर तर मुलींच्या एकेरीत पुण्याची नायशा रेवासकर विजेते ठरले.
चौथ्या मानांकित असलेल्या इशान खांडेकर याने अंतिम सामन्यात ठाण्याच्या प्रतीक तुलसानीचा अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत ३-२ ने पराभव करून विजेतेपद मिळवून सुवर्ण पदक पटकावले. दोघांनी पहिले दोन दोन गेम जिंकून बरोबरी करत पाचव्या निर्णायक गेममध्ये अत्यंत आक्रमक खेळ करत निर्णायक क्षणी इशान खांडेकर याने दोन गुण मिळवित १३-११ असा गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या एकेरीत पुण्याच्या नायशा रेवासकरने अंतिम सामन्यात ठाण्याच्या वैदेही ठाकरेचा ११-४,११-९, ९-११, ११-६ असा ३-१ ने पराभव करून विजय मिळवीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले
स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, कु. रुचिता ठाकूर व तालुका क्रीडाधिकारी अविनाश टिळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राज्य टेबल टेनिस संघटनेचे जनरल सेक्रेटरी यतिन टिपणीस, संजय कडू, महेंद्र चिपळूणकर, अशोक राऊत, प्रकाश जसानी आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.