- २० ते २४ सप्टेंबर दरम्यान आयोजन
नासिक : एनजीएन नेटवर्क
जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने राज्य अजिंक्यपद मानांकन टेबल टेनिस स्पर्धा येत्या २० ते २४ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. होत आहे. नासिक जिमखाना येथे होणाऱ्या या स्पर्धा एकूण आठ टेबलावर खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धा पुरुष, महिला, मुले व मुलींच्या होणार असून त्यामध्ये ११, १३, १५, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली तसेच पुरुष व महिला अशा एकूण १२ विविध वयोगटाचा समावेश राहील. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ७९३ प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेत प्रीसाईज टेबल्स व डबल फिश कंपनीचे बॉल्स वापरले जाणार आहेत.
यास्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यात नाशिकच्या १३ वर्षाखालील मुलींच्या गटाचे महाराष्ट्राची प्रथम मानांकन असणारी केशिका पूरकर, १९ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम मानांकित स्वरा करमरकर असलेल्या टेबल टेनिसपटूंचा सहभाग आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष व चेअरमन समन्वयक कमिटी शेखर भंडारी, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, सौ. अलका कुलकर्णी, संजय वसंत, अलीअसगर आदमजी,
सुहास आगरकर, जय मोडक, पुनीत देसाई अजिंक्य शिंत्रे, राजा आहेर, धनंजय बर्वे, स्वाती आगरकर आदी प्रयत्नशील आहेत.
Comments are closed.