चांदवड : मधूर गुजराथी
चांदवड तालुक्यातील धोंडबे शिवारात 22 वर्षीय हायवा चालकास बुधवारी ( दि. 28 ) सकाळी हायवा ट्रक (क्रमांक एम. एच .15 जे . डब्लयु JW 2945 ) मागील हायड्रोलीक ट्रॉली वर होऊन तिचेवर असलेली इलेक्ट्रिक तारेचा धक्का लागुन अजितकुमार परशुराम महतो (22) (रा. सोखाडी, ह. मंजुरा, ता. कसमार, जि. बोकारो, झारखंड, हल्ली रा.धोंडबे ता.चांदवड ) हा गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना भोये यांनी मयत घोषीत केल्याची खबर वडनेरभैरव पोलिस स्टेशनला पोलीस पाटील गंगाधर त्र्यंबक उशीर धोंडबे यांनी दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.
Comments are closed.