नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पाच दिवसांपूर्वी सोबत असताना झालेल्या अपघातात मैत्रिणीला गमावलेल्या मित्राने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. निलेश पाटील ( २१, रा. चेतनानगर, नाशिक ) असे या युवकाचे नाव असून त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात निलेश हादेखील किरकोळ जखमी झाला होता.
आपली मैत्रीण माही शर्मा ( १८, रा. चेतनानगर) हिच्यासोबत स्वत:च्या मोटारसायकलवर बारदान फाटा, गंगापूर रोड येथून येत असताना त्यांची गाडी स्लीप झाली आणि दोघे खाली पडले. याचवेळी मागाहून येणाऱ्या अवजड वाहनाखाली येऊन माही हिचा मृत्यू झाला होता. जखमी निलेश यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची मनस्थिती मैत्रीण गेल्यापासून ठीक नव्हती. रुग्णालयातून घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला एकटा न सोडण्याची खबरदारी घेतली होती. मात्र गुरुवारी रात्री एकटा असताना निलेश याने घरातील एका खोलीत जावून पंख्याला गळफास घेत मैत्रिणीच्या विरहात मृत्यूला कवटाळले. बेशुद्धावस्थेत निलेश यास रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निलेश येथील गुरु गोबिंदसिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाने परिसर हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.