
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार केंद्र चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका परिसरात छापा टाकलेल्या या केंद्रातून पाच पीडित तरुणींची सुटका केली. यासंदर्भात मसाज पार्लर संचालक महिला खुशबू परेश सुराणा मसाज पार्लर संचालक महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई नाका परिसरातील मेट्रोझोन समोर ‘आरंभ स्पा’ या नावाने खुशबू सुराणा हिने मसाज पार्लर सुरु केले होते. मात्र, या केंद्रावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. पीडित युवती नाशिक, कानपूर, दिल्ली, मिझोराम, बिहार येथील असल्याचे चौकशीत आढळून आले. यासंदर्भात खुशबू हिच्याविरोधात मुंबई नका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तिच्याविरोधात यापूर्वीही पिटा आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
Comments are closed.