NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या केशिकाला ‘सुवर्ण’, स्वराला ‘रौप्य’; राज्य मानांकन टे टे स्पर्धा

यश भंडारी यास १५ वर्षाखालील मुलांच्या गटाचे कांस्य पदक

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या केशिक पुरकर हिने सुवर्ण तर स्वरा करमरकर हिने १९ वर्षाखालील मुलींच्या गटात रजत पदक पटकावले. केशिका पुरकरचे पाठोपाठ झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्ण पदक आहे तर स्वरा करमरकरचे या वर्षी झालेल्या तीन राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील चौथे पदक आहे. याच स्पर्धेत यश भंडारी याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटाचे कांस्य पदक पटकावले.

१३ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या प्रथम मानांकित केशिका पुरकरने अंतिम फेरीत ठाण्याच्या सहाव्या मानांकित धनश्री तरडेशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ९-११, ११-९, ११-९, ८-११, १२-१० असा ३-२ ने पराभूत करून राज्य विजेतेपद पटकावत या गटातील हे तिसरे सुवर्ण पदक आपल्या नावे केले.

१९ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकरचा उपांत्य फेरीत ठाण्याच्या दहावे मानांकन असलेल्या काव्या भटने ने ७-११, ११-६, १२-१०, ९-११, ११-६, १२-१० असा ४-२ ने पराभव केला. त्यामुळे स्वराला या गटात कांस्य पदक मिळाले. १५ वर्षाखालील मुलांच्या एकेरीत नाशिकच्या यश भंडारी याची उपांत्यफेरीत गाठ पडली ती या स्पर्धेतील प्रथम मानांकित ठाण्याच्या निलय पाटेकरशी. यशचा त्याने ११-५, ११-६, ११-६ असा ३-० ने पराभव केल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, सतीश पटेल, अलका कुलकर्णी, अलीअसगर आदमजी, कोच जय मोडक, पुनीत देसाई, धनजय बर्वे, अजिंक्य शिंत्रे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comments are closed.