NGN News
Latest Marathi News

हृदयद्रावक ! आधी चार मुलांना विहिरीत ढकलले, मग स्वत: आमहत्या केली

 पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापाचे टोकाचे पाऊल

शिर्डी : एनजीएन न्यूज नेटवर्क

पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह स्वतःचे जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखली कोरेगाव (ता. श्रीगोंदा ) येथे घडली आहे. अरुण काळे ( वय 30 ) असे कुटुंबप्रमुखाचे नाव आहे. त्यांनी आपली एक मुलगी आणि तीन मुलांसह आत्महत्या केली.

 प्राप्त माहितीनुसार अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीशी वाद झाला होता, या वादामुळे त्यांची पत्नी आठ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी येवला येथे गेली होती. मात्र बायको घरी येत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे, आधी त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी असा अंदाज आहे. दरम्यान  विहिरीपासून काही अंतरावर काळे यांची मोटर सायकल आढळली आहे. श्रीगोंदा येथून अरुण काळे हे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवर राहाता तालुक्यातील को-हाळे शिवारात आले होते,  को-हाळे शिवारात शिर्डी – नगर बायपासच्या कडेला मोटरसायकल लावून ते विहिरीपर्यंत गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Comments are closed.