नासिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून दोन लाख सोळा हजार रुपये रक्कम लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी दिंडोरी पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उप अभियंत्यास लाचलुचपत विभागाच्या करवी रंगेहाथ पकडण्यात आले.
दिंडोरी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता (वर्ग -१) योगेश नारायण घारे व कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव अशी लाचखोरांची नावेआहेत. तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून त्यांनी सावरपाडा, तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथे काम केले आहे. यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात तक्रारदाराकडून लाच म्हणून २,१६००० रुपये रकमेची मागणी करण्यात आली. प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या वतीने सापळा रचण्यात येवून घारे आणि जाधव या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
Comments are closed.