NGN News
Latest Marathi News

धनादेश न वटल्याने बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक

गौतमनगर न्यायालयाच्या आदेशानंतर गुंडाविरोधी पथकाची कारवाई

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. एका व्यवहारात दिलेला धनादेश न वटल्याने कार्ड यांना अटक करण्यात आली आहे. गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलेला धनादेश बाउन्स झाल्यानंतर कार्ड यांच्याविरोधात उत्तर प्रदेश मधील गौतमनगर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. कारडा यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. कारडा हे गेले काही दिवस फरार असल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. आज ते नाशिकच्या द्वारका परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारडा यांना गौतमनगर न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.