मालेगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
दुचाकीवरून आलेल्या तिघांनी युवकाची हत्या केल्याने गुरुवारी रात्री शहरात खळबळ उडाली. वर्दळीच्या मोतीबाग नाका परिसरात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्र आणि लाडकी दांडक्याने युवकावर हल्ला करून त्यास जखमी केले आणि नंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. नितीन निकम ( २५ ) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नितीन हा जुन्या राष्ट्रीय हमरस्त्यावरील मोतीबाग नाका परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असताना दुचाकीवरून तिघे जण घटनास्थळी आले. त्यांनी नितीन याच्यावर हल्ला करून त्यास रक्तबंबाळ केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. नितीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिघे त्याच दुचाकीवरून पसार झाले. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपासाची चक्र फिरवली. त्यानुसार सचिन अहिरे, परेश पगारे आणि केतन अहिरे ( सर्व राहणार मालेगाव ) यांना ताब्यात घेतले. हल्ल्याचे कारण समजू शकले नसले तरी पूर्व वैमनस्यातून तो झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ माजली.
Comments are closed.