नंदुरबार : एनजीएन न्यूज नेटवर्क
वादग्रस्त वक्तव्यांनी सापडलेल्या आणि वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमांडळ येथील शनी मंदिरात पुजार्चा करीत साकडे घातले आहेत. नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना कोकाटे यांनी देशातील एकमेव शनि देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून लौकिक असलेल्या शनिमांडळच्या शनी मंदिरास भेट दिली.
राज्याचे कृषीमंत्रीपद स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांबाबत केलेली वक्तव्ये, विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ, सरकारला अडचणीत आणणारी इतर वक्तव्ये, यामुळे मंत्री कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटेंच्या वक्तव्तावर नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी अजित पवार यांनी कोकाटे यांना चर्चेसाठी बोलावले आहे. त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतला जातो की खातेबदल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच आपल्या मागची इडा पिडा टळावी यासाठी कोकाटे यांनी आता शनिदेवाला साकडं घातल्याचे बोलले जाते. मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा, अशी प्रार्थना त्यांनी केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Comments are closed.