NGN News
Latest Marathi News

कुंभमेळा काळात पुरोहित संघाबरोबर पोलिसांची समन्वयाची भूमिका

  • आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रतिपादन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पुरोहित संघाबरोबर पोलिसांची सतत समन्वयाची भूमिका राहील आणि आगामी कुंभमेळा काळात दोघेही हातात हात घालून काम करू, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. श्रीगंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघासमवेत पोलीस आयुक्त कर्णिक यांची समन्वयक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.नवनिर्वाचित पुरोहित संघाच्या कार्यकारणीचे कर्णिक यांनी अगदी मनापासून स्वागत केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तीर्थावर तसेच कुंभमेळा काळात येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा कशा देता येतील,त्याचे नियोजन कसे करता येईल व गोदावरी प्रेमींना ते कसे सुखावह ठरेल,कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही बैठकीत विस्तृत चर्चा झाली.कर्णिक यांनी पुरोहित संघाच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेऊन काही मुद्द्यांचे लगेचच निरसन केले.कुंभमेळा काळात कायदा व सुव्यवस्थेची योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही कर्णिक यांनी यावेळी दिले.

बैठकीस नूतन अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी,उपाध्यक्ष वेदमूर्ती शेखर शुक्ल,नितीन पाराशरे व निखिल देव, संघटक धनंजय बेळे, कोषाध्यक्ष वैभव क्षेमकल्याणी, चैतन्य गायधनी, अमित पंचभैये, अमित गायधनी, सदानंद देव, राहुल अगस्ते, उपेंद् देव, सौरभ गायधनी, मंदार देव, माणिक शिंगणे आदी पदाधिकारी तसेच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके व कुंभमेळा कक्षाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.