
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सेंट फ्रान्सिस हायस्कूल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अगस्टिंन पिंटो, संस्थापिका डॉक्टर ग्रेस पिंटो यांच्या मार्गदर्शनांद्वारे सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून योगाचा एक कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आमच्याच विद्यालयाची विद्यार्थिनी योगशिक्षिका अक्षता दुसाने केकन उपस्थित होती कार्यक्रमाची सुरुवात प्रभू येशूच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर पवित्र ग्रंथ बायबल मधील वचन पठण करण्यात आले . त्यानंतर सूक्ष्म योग सूत्र या संस्थेच्या योग शिक्षिका अक्षता दुसाने केकन यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवले. व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योगासने सहभाग नोंदविला. सुदृढ शरीरात सुदृढ वसते. या सुविचाराप्रमाणे सर्वांनी आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मनोगत सरांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन शौर्या कटारे या विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभाग प्रमुख भाग्यश्री मराठे व इतर शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.
Comments are closed.