
मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन सादर
येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील ग्रामीण, इतर जिल्हा व प्रमुख जिल्हा मार्गांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्यांच्या तातडीने दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ, रुंदीकरण तसेच आवश्यकतेनुसार सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सजग नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती चे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गांवरून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत.
यापूर्वी भुजबळ यांच्या माध्यमातून या भागात उभारण्यात आलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली होती. मात्र, रस्त्यांचे आयुष्यमान संपुष्टात येणे, अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अपेक्षित दर्जा न राखल्यामुळे अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
#
दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ व रुंदीकरणाची मागणी असलेले रस्ते :-
रहाडी ते भारम – इतर जिल्हा मार्ग क्र. १८९
रहाडी ते खरवंडी – इतर जिल्हा मार्ग क्र. ११५
रहाडी ते नाराळा (येवला तालुका हद्दीपर्यंत) – ग्रामीण मार्ग क्र. ३५
खरवंडी ते वाघाळे – ग्रामीण मार्ग क्र. १९६
खरवंडी ते रेंडाळे – ग्रामीण मार्ग क्र. ५४
सायगाव ते न्यारखेडा बुद्रुक – ग्रामीण मार्ग क्र. १२२
वाघाळे – आडसुरेगाव – भुलेगाव – खामगाव – इतर जिल्हा मार्ग क्र. २२
तळवाडे – विठ्ठलवाडी जि.प. शाळा ते गवंडगाव – ग्रामीण मार्ग क्र. ११८
राजापूर – पन्हाळ साठे – पिंपळखुटे तिसरे (आहेरवाडीकडे) – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७०
राजापूर – कोळगाव बंधारा मार्गे कोळगाव – ग्रामीण मार्ग क्र. ९९
गारखेडा – देवठाण – ग्रामीण मार्ग क्र. १२९
#
दर्जावाढ, संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी असलेले प्रमुख जिल्हा मार्ग
येवला – नागडे – धामणगाव – सायगाव फाटा – कौटखेडा – तळवाडे – डोंगरगाव – भारम – वाघाळे – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७८
डोंगरगाव – कोळम बुद्रुक – कोळम खुर्द – न्यारखेडा खुर्द – न्यारखेडा बुद्रुक – वाई बोथी – नगरसूल – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६८
या दोन्ही प्रमुख जिल्हा मार्गांची दर्जावाढ करून आवश्यक रुंदीकरणासह संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मार्ग येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील अनेक गावांना येवला शहर, नगरसूल, लासलगाव तसेच इतर प्रमुख बाजारपेठांशी जोडणारे मुख्य दळणवळण मार्ग असल्याने या कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
#
“येवला पूर्व भागात रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा, नवीन कामे पूर्ण होईपर्यंत सर्व खड्डेमय रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती झाली पाहिजे. निकृष्ठ कामांची गुणवत्ता, दर्जा, आयुष्यमान याचे लेखा लेखा परीक्षण झाले पाहिजे “
भागवतराव सोनवणे
संयोजक :- सजग नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती
#
“जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध होणार असून लवकरच जिल्हा परिषदे कडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी करण्यात येईल.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या प्रस्तावांना चालना देण्यात देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल”
: छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा
Comments are closed.