NGN News
Latest Marathi News

तुंबाडची मंजुळाचा प्रीमियर मराठी झी5 वर

भीती, विनोद आणि पराकोटीच्या नाट्याची खमंग फोडणी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

 वर्षातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरल्यानंतर, ‘तुंबाडची मंजुळा’ 7 ऑगस्ट रोजी मराठी झी5 वर त्याच्या जागतिक डिजिटल प्रीमिअरसाठी सज्ज आहे. पोट धरून हसायला लावणारा भन्नाट विनोदी, अलौकिक वळणे आणि मुळाशी असलेले एक भावनिक कथाबीज अशी जमून आलेली भट्टी चित्रपटगृहातील प्रदर्शनादरम्यान समीक्षकांची प्रशंसा आणि प्रेक्षकांचे प्रेम या दोन्ही गोष्टी जिंकल्यानंतर मंचावर दाखल होणार आहे. विविध कोरगावकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओ निर्मित ‘तुंबाडची मंजुळा’या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

केशव कोणालाही हानी न पोहोचवणारे खोटे बोलतो की त्याला मंजुळा नावाच्या महिलेच्या आत्म्याने झपाटले आहे. संपूर्ण गाव गोंधळात पडते. त्याचा अभिमान वाचवण्याचा प्रयत्न म्हणून जो खेळ सुरू होतो; तो लवकरच भूत कथा, अंधश्रद्धा आणि अनपेक्षित खुलाशांचा समावेश असलेल्या घटनांच्या मजेदार साखळीत परावर्तित होतो. विनोद, भीतीदायक क्षण आणि हृदयस्पर्शी भावनांनी भरलेला हा चित्रपट चतुराईने अंधविश्वास, सामाजिक पूर्वग्रह आणि करुणेचे महत्त्व उलगडतो. ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे छान मनोरंजन करतो.

तुंबाडची मंजुळा हा 2026 मधील सर्वाधिक गाजलेल्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक ठरला आहे. भय, विनोद आणि हृदयस्पर्शी कथानकाचा ताजातवाना संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक पात्र प्रभावीपणे साकारले गेले आहे. भरभरून हसवतानाच अंधविश्वास, पूर्वग्रह आणि मानवतेचा भावनिक संदेश देणारा हा चित्रपट मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडतो. लक्षात राहणारी पात्रे, आगळ्यावेगळ्या घटना, अनपेक्षित वळणे आणि कौटुंबिक मनोरंजनाचा परिपूर्ण मेळ साधणारा तुंबाडची मंजुळा हा सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरतो.

हेमा व्ही. आर., चीफ चॅनल ऑफिसर – झी मराठी आणि बिझनेस हेड– मराठी झी5, म्हणाल्या:“ब्लॉकबस्टर ‘तुंबाडची मंजुळा’ मराठी झी5वर आणताना आम्हाला आनंद होतो आहे. भीतीदायक थरार आणि पोट धरून हसायला लावणाऱ्या विनोदाचे मिश्रण असलेला हा एक भीतीदायक विनोदी चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबासाठी परिपूर्ण मनोरंजनाचे आश्वासन देतो. कोकणच्या चैतन्यमय पार्श्वभूमीवर आधारित, हा चित्रपट एक आश्चर्यकारकपणे गुंतवून ठेवणारी कथा आणि हृदयस्पर्शी तसेच गुदगुल्या करणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या अभिनयाने उंचावला आहे. मराठी झी5वर या मजेदार प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा प्रेक्षक आनंद घेतील असा आम्हाला विश्वास आहे.”

दिग्दर्शक विविध कोरगांवकर म्हणाले:“अगदी सुरुवातीपासूनच, प्रेक्षकांचे हास्याने मनोरंजन करणारा चित्रपट तयार करणे आणि आपल्या समाजाला आकार देणाऱ्या श्रद्धा आणि धारणा प्रतिबिंबित करणे हे आमचे उद्दिष्ट होते. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला मिळालेले प्रेम खरोखरच जबरदस्त आहे आणि मला आनंद वाटतो की आणखी अनेक प्रेक्षकांना आता मराठी झी5वर तुंबाडची मंजुळा अनुभवता येईल.”

जितेंद्र जोशी म्हणाला: “केशव हे असे पात्र आहे ज्याचे एक छोटेसे खोटे अकल्पनीय गोंधळ निर्माण करते आणि म्हणूनच कलाकृतीचा प्रवास मनोरंजक बनतो. चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांचा प्रतिसाद अविश्वसनीय होता आणि मला आनंद आहे की हा चित्रपट आता मराठी झी5च्या माध्यमातून आणखी बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.”

सई ताम्हणकर म्हणाली: “तुंबाडची मंजुळा’बद्दल मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ती विनोदी, भयपट आणि भावना यांच्यात किती सहजतेने फिरते. ही एक अशी कथा आहे जी प्रेक्षकांना विचार करण्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण देताना मनोरंजन करते.मराठी झी5वर प्रेक्षक त्यांच्या कुटुंबियांसमवेत या चित्रपटाचा आनंद घेतील, यासाठी मी उत्सुक आहे.”

भूतावळ, गोंधळ, हृदय आणि भरपूर आश्चर्यांनी भरलेल्या हास्यमय प्रवासासाठी तयार व्हा; कारण 07 ऑगस्ट रोजी केवळ मराठी झी5वर तुंबाडची मंजुळाचा प्रीमियर होईल.

Comments are closed.