
- पहिल्या यशस्वी वर्षानंतर मराठी झी 5च्या कंटेंट विश्वाचा आणखी विस्तार; लोकप्रिय फ्रँचायझी, नवीन ओरिजिनल्स, चित्रपट आणि प्रीमियम मनोरंजनाचा समावेश
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतभरात प्रादेशिक कंटेंटमुळे प्रेक्षकांच्या मनोरंजन पाहण्याच्या सवयींमध्ये बदल होत असताना, मराठी झी 5वर वर्षभर मराठी ओरिजिनल्स, चित्रपट आणि विविध प्रकारचा कंटेंट सादर करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करण्यात येत असून, या क्षेत्रात मराठी झी 5 ने आघाडी कायम ठेवली आहे. मराठी कथांमधील आशयाची खोली, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी यांवर विश्वास ठेवून सुरू करण्यात आलेल्या या प्रवासातून प्रादेशिक स्ट्रीमिंग क्षेत्रातील सर्वात भक्कम कंटेंट परिसंस्थांपैकी एक इकोसिस्टीम विकसित झाली आहे. प्रेक्षकांकडून मिळालेली पसंती, वाढती प्रेक्षकसंख्या आणि यशस्वी ओरिजिनल्समुळे पहिले वर्ष उल्लेखनीय ठरले. या यशानंतर मराठी झी 5ने आज आपल्या दुसऱ्या वर्षासाठी महत्त्वाकांक्षी आणि वैविध्यपूर्ण नव्या कंटेंटची घोषणा केली. वर्षभर प्रेक्षकांसाठी दर्जेदार मराठी कथा सादर करण्याची आपली वचनबद्धता यामुळे पुन्हा अधोरेखित करण्यात आली आहे.
Link: https://youtu.be/RDCknEvAARs
मराठी झी 5च्या या नव्या आणि वैविध्यपूर्ण कंटेंटमध्ये लोकप्रिय फ्रँचायझी, नवीन ओरिजिनल सीरिज, थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे चित्रपट, चित्रपटगृहांमधील यशस्वी प्रदर्शनानंतर होणारे डिजिटल प्रीमियर्स आणि लाइव्ह स्पोर्ट्स यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे एक सर्वसमावेशक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. आघाडीच्या निर्मिती संस्थांसोबत सहयोग करण्यात येत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत निर्मात्यांच्या कलाकृतींनाही या प्लॅटफॉर्मवर स्थान देण्यात येणार आहे. कथा, प्रतिभावंत कलाकार आणि नावीन्य यांमध्ये प्लॅटफॉर्मकडून सातत्याने करण्यात येत असलेली गुंतवणूक या नव्या कंटेंटमधून दिसून येते.
सीरिजच्या आगामी कंटेंटमध्ये मराठी झी 5च्या सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझींपैकी दोन फ्रँचायझी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बहावा एंटरटेनमेंटची ‘हे काय नवीन?’ ही सीरिज दुसऱ्या सीझनसह परत येत असून, उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर सिनेमास्टर्स प्रॉडक्शनच्या ‘देवखेळ’ सीझन 2मध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. याशिवाय नव्या ओरिजिनल्सचाही वैविध्यपूर्ण कंटेंट सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये भरत जाधव, शर्वरी जमेनीस, पुष्कर श्रोत्री आणि शिवानी रांगोळे यांच्या भूमिका असलेल्या ‘कोण यशवंत पानसरे?’ तसेच कोक्लिको पिक्चर्सच्या ‘112’चा समावेश आहे. ‘112’ची निर्मिती निखिल महाजन यांनी केली असून, जीविषा काळे आणि रोहित सातपुते यांनी दिग्दर्शन केले आहे. नवीन प्रतिभावंतांना संधी, प्रभावी कथा आणि विविध प्रकारच्या कथानकांवर आधारित कंटेंटमध्ये प्लॅटफॉर्मकडून सातत्याने करण्यात येत असलेली गुंतवणूक या नव्या सीरिजमधून दिसून येते.
सीरिजच्या या दमदार कंटेंटसोबतच विविध जॉनर आणि फॉरमॅटमधील चित्रपटांचाही तितकाच महत्त्वाकांक्षी कंटेंट सादर करण्यात येणार आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर झी 5वर प्रीमियर होणाऱ्या चित्रपटांमध्ये झी स्टुडिओजच्या ‘तुंबाडची मंजुळा’चा समावेश असून, त्यामध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे आणि ओम भुतकर यांच्या भूमिका आहेत. तसेच नील सालेकर, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, सौरभ घाडगे आणि करण सोनावणे यांच्या भूमिका असलेला ‘भूतम् भयम्’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय मंगेश पवार कंपनीच्या ‘अडकित्ता’ या ओरिजिनल चित्रपटाचा प्रीमियरही होणार असून, सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या कंटेंटची ही केवळ एक झलक असून, वर्षभरात आणखी अनेक ब्लॉकबस्टर सरप्राइजेस सादर करण्यात येणार आहेत.
प्लॅटफॉर्मवरील मनोरंजनाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी ‘हसवा हसवी – द मराठी स्टँड-अप शो’ हा कॉमेडी स्पेशल सादर करण्यात येणार आहे. अनिश गोरेगांवकर प्रॉडक्शन्सच्या या शोमध्ये अनिश गोरेगांवकर, फातिमा आयेशा, संकेत जोशी, साहिल होराणे आणि साहिल शेख यांचा सहभाग आहे. कथा आणि पटकथेवर आधारित मनोरंजनाच्या पलीकडे जात, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी विविध प्रकारचा कंटेंट उपलब्ध करून देत मराठी झी 5वर समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कंटेंटची व्याप्ती सातत्याने वाढवण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लायब्ररीमध्ये ‘गरुड’, ‘विक्रम वेताळ’, ‘शिव सती’, ‘चंद्रकांता’, ‘तिरुपती बालाजी’, ‘नर्मदा’, ‘राम अंजनेय युद्ध’ आणि ‘बर्बरिक’ यांसारख्या प्रीमियम एआय टायटल्सचा समावेश आहे. मनोरंजनाच्या या कंटेंटसोबतच लाइव्ह स्पोर्ट्सची व्याप्तीही वाढवण्यात येत असून, त्यामध्ये ‘फिफा’, ‘बुंडेसलिगा’, ‘सीरी ए’ आणि ‘आयएलटी20’ यांसारख्या प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.
या सर्व टायटल्समधून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण आणि परिपूर्ण कंटेंट अनुभव देण्याचा मराठी झी 5चा दृष्टिकोन दिसून येतो. नामवंत कलाकार, आधुनिक पद्धतीने सांगण्यात येणाऱ्या कथा तसेच कॉमेडी, ड्रामा, हॉरर आणि कौटुंबिक मनोरंजनाचा समृद्ध मिलाफ यामुळे राज्यभरातील प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे मनोरंजन उपलब्ध होणार आहे.
झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी झी 5च्या बिझनेस हेड व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “मराठी झी 5 सुरू करण्यात आले तेव्हा आमचा विश्वास साधा पण ठाम होता. मराठी प्रेक्षकांसाठी अधूनमधून प्रादेशिक कंटेंट सादर करण्याऐवजी खास त्यांच्यासाठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असायला हवा, असे आम्हाला वाटत होते. आज ओरिजिनल मराठी कथांमध्ये सातत्याने गुंतवणूक करणारे वचनबद्ध आणि नावीन्यपूर्ण ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा हा दृष्टिकोन योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. नव्या दमदार आणि वैविध्यपूर्ण कंटेंटमधून मराठी माणसाची जिद्द, निर्धार, धैर्य आणि उत्कटता दिसून येते. प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलेल्या लोकप्रिय सीरिजच्या नव्या सीझन्ससोबतच नवीन ओरिजिनल्स, चित्रपट आणि नव्या स्वरूपातील कंटेंटही सादर करण्यात येत आहे. त्यातून स्ट्रीमिंगवरील मराठी मनोरंजनाच्या कक्षा आणखी विस्तारण्यात येत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मराठी मनोरंजन क्षेत्रातील अफाट सर्जनशील प्रतिभेचे प्रतिबिंब या कंटेंटमध्ये पाहायला मिळते. आपल्या मातीतल्या कथांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचेही हे प्रतिबिंब आहे.’
ओरिजिनल सीरिज आणि चित्रपटांपासून चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर होणारे डिजिटल प्रीमियर, एआय आणि कॉमेडीपासून लाइव्ह स्पोर्ट्सपर्यंत विविध प्रकारचा कंटेंट मराठी झी 5वर सातत्याने सादर करण्यात येत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी सर्वसमावेशक मनोरंजनाचे व्यासपीठ म्हणून मराठी झी 5ने आपले वेगळेपण कायम राखले असून, या क्षेत्रात इतरत्र न आढळणारे कंटेंटचे वैविध्य आणि सातत्य येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Comments are closed.