NGN News
Latest Marathi News

बायरकडून बागायतदार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘झिवाना स्मार्ट’ सादर

  • झिवाना स्मार्टडाऊनी मिल्ड्यू आणि लेट ब्लाइटवर उत्कृष्ट नियंत्रण देते
  •  “प्रतिरोधकता (रेझिस्टन्स) विकसित होण्याचा धोका कमी करण्यासाठी विकसित केलेले.”
  • द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी बायरची मजबूत उत्पादनश्रेणी अधिक बळकट करते

नाशिक एनजीएन न्यूज नेटवर्क

बायरने आज झिवाना स्मार्ट या आपल्या नवीनतम बुरशीनाशक उत्पादनाच्या प्रारंभाची घोषणा केली. हे उत्पादन केवडा डाऊनी मिल्ड्यू आणि लेट ब्लाइट अशा विनाशकारी रोगांपासून उच्च-मूल्याच्या फळबाग पिकांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. एफआरएसी गट ४९ अंतर्गत असलेल्या नवीन सक्रिय घटकाच्या साहाय्याने झिवाना स्मार्ट द्राक्षे,काकडीवर्गीय पिके,बटाटा आणि टोमॅटोमध्ये उत्कृष्ट रोग नियंत्रण प्रदान करते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची गुणवत्ता जपण्यास,उत्पादकता सुधारण्यास आणि परतावा वाढविण्यात मदत होते.डाऊनी मिल्ड्यू आणि आणि लेट ब्लाइट हे फळबाग पिकांवर परिणाम करणाऱ्या सर्वात विनाशकारी रोगांपैकी आहेत आणि अनेकदा शेतकऱ्यांच्या पीक संरक्षण खर्चापैकी जवळपास निम्मा खर्च याच रोगांवर होतो. बदलत्या हवामानामुळे आणि दीर्घकाळच्या आर्द्रतेमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना अशा नाविन्यपूर्ण उपायांची आवश्यकता आहे जे शाश्वत शेती पद्धतींना पाठिंबा देताना विश्वसनीय आणि दीर्घकाळ टिकणारे संरक्षण प्रदान करतील.

झिवाना स्मार्ट आपल्या आधुनिक कार्यपद्धतीने या आव्हानाला सामोरे जाते जी ऊमायसीट रोगांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करते. हे द्रावण पावसाळी परिस्थितीतही सरासरी ७ ते १४ दिवस टिकणाऱ्या संरक्षणासह उत्कृष्ट परिणामकारकता प्रदान करते. पावसाचा परिणाम न होण्याचा त्याचा गुणधर्म आणि आधीच अस्तित्वात असलेली पाने व नवीन वनस्पतींची वाढ या दोन्हींचे संरक्षण करण्याची क्षमता, शेतकऱ्यांना संपूर्ण पीक चक्रात रोगांचा प्रादुर्भाव अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास सक्षम करते.

या उत्पादनाच्या शुभारंभाबाबत बोलताना बायरच्या पीक विज्ञान विभागाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन बाबू म्हणाले: “भारताच्या पोषण सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी फलोत्पादन हे केंद्रस्थानी आहे. झिवाना स्मार्टच्या माध्यमातून बायर एक विज्ञानकेंद्री नवसंशोधन आणत आहे. ते फलोत्पादक शेतकऱ्यांना रोगांच्या गुंतागुंतीच्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यास, पिकांची गुणवत्ता जपण्यास आणि अधिक लवचिक व शाश्वत अन्नप्रणाली तयार करण्यास मदत करते.”झिवाना स्मार्ट हे महाराष्ट्र,कर्नाटक,तामिळनाडू,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल,छत्तीसगड,मध्य प्रदेश,गुजरात, राजस्थान,आसाम,आंध्र प्रदेश आणि पंजाब यांसारख्या प्रमुख फलोत्पादन करणाऱ्या प्रदेशांमध्ये उपलब्ध होईल.झिवाना स्मार्ट हे उत्पादन शेतकऱ्यांना लवचिकता, उत्पादकता आणि शाश्वत कृषी परिणामांसाठी उपयुक्त नावीन्यपूर्ण पीक संरक्षण उपायांसह सक्षम करण्याच्या बायरच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते.

Comments are closed.