NGN News
Latest Marathi News

कल्याण ज्वेलर्सचे नाशिक स्टोर नवीन आणि भव्य रूपात पुन्हा सेवेत

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतातील एक सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज नाशिकमधील शरणपुर रोड येथे आपल्या अपग्रेडेड शोरूमच्या शुभारंभाची घोषणा केली. या भव्य शोरूमचे उद्घाटन ४ एप्रिल (शनिवार) रोजी संध्याकाळी ५ वाजता बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते करण्यात येईल.

हे नवीन शोरूम महाराष्ट्रातील कल्याण ज्वेलर्सच्या प्रगतीमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्राहकांना खरेदीचा उत्कृष्ट अनुभव आणि दागिन्यांचे असंख्य पर्याय देण्याची आमची वचनबद्धता यातून अधिक मजबूत होते. नाशिकमधील या शोरूममध्ये पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक रिटेल तंत्रज्ञानाचा एक सुंदर संगम पाहायला मिळेलजो इथल्या जाणकार व चोखंदळ ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.

शोरूमच्या उद्घाटनाप्रसंगी कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरमन म्हणाले: “नाशिकमध्ये आमचे हे नवीन रूपातील शोरूम सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या मौल्यवान ग्राहकांना खरेदीचा एक अधिक दर्जेदार आणि आलिशान अनुभव देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. हे नवीन शोरूम आता अधिक सोयीस्कर आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेजे आमच्या उत्कृष्ट सेवा देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. नेहमीप्रमाणेचआम्ही गुणवत्ताउत्तम सेवा आणि पारदर्शक दरांच्या विश्वासासहसुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची मोठी श्रेणी सादर करत राहू.”

शोरूम पुन्हा सुरु होत असल्याच्या आनंदाप्रीत्यर्थकल्याण ज्वेलर्सने शानदार ऑफर्स जाहीर केल्या आहेतज्यामुळे ग्राहकांना आपल्या खरेदीवर मोठी बचत करण्याची संधी मिळणार आहे. रिलॉन्च ऑफरचा भाग म्हणूनकल्याण ज्वेलर्स दागिन्यांच्या व्हॅल्यू ऍडिशनवर ५०% पर्यंत सूट देत आहे. याव्यतिरिक्तकल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट देखील लागू असेलजो बाजारपेठेत सर्वात कमी असून कंपनीच्या सर्व शोरूममध्ये एकसमान असतो. या ऑफर्स केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत.

ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सचे ‘४-लेव्हल अश्युरन्स सर्टिफिकेट देखील मिळेल. हे प्रमाणपत्र दागिन्यांची शुद्धतात्यांचे आजीवन मोफत मेंटेनन्सउत्पादनाची संपूर्ण माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक पॉलिसीची हमी देते. हे प्रमाणपत्र आपल्या निष्ठावान ग्राहकांना नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

या नवीन शोरूम्समध्ये कल्याण ज्वेलर्सचे लोकप्रिय ब्रँड्स देखील उपलब्ध असतील – मुहूर्त (वेडिंग ज्वेलरी कलेक्शन)मुद्रा (हताने घडवलेले अँटीक दागिने)निमाह (टेंपल ज्वेलरी)ग्लो (डान्सिंग डायमंड्स)जिया (सॉलिटेअरप्रमाणे दिसणारे हिऱ्यांचे दागिने)अनोखी (अनकट हिरे)अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठीचे दागिने)अंतरा (वेडिंग डायमंड्स)हेरा (रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने)रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि नुकतेच लाँच झालेले कलेक्शन लीला (रंगीबेरंगी खडे आणि हिऱ्यांचे दागिने) यांचा यात समावेश आहे.

Comments are closed.