
- एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्याकडून गंभीर दखल; गीते बंधूंना स्पष्टीकरण देणे भाग
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘पसंती क्रमांक एक- गोकुळ गीते ‘ असा मजकूर असलेली बनावट मतपत्रिका समाज माध्यमांवर प्रसृत झाल्याने ऐन मतदानाच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यानंतर गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी माध्यमांसमोर येवून आम्ही युतीधर्म पळत असून कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असा खुलासा केल्यानंतर वातावर शांत झाले. दरम्यान, सदर प्रकार आमची बदनामी करणारा असल्याचा आरोप करीत यामागे षड्यंत्र असल्याचा दावा गनिएश गीते यांनी यावेळी केला.
विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार असताना आणि प्रसाद हिरेंसह गोकुळ गीते यांनी जाहीर माघार घेतलेली असताना ऐन मतदानाच्या दिवशी एक गंभीर प्रकार घडला. समाज माध्यमांवर ‘पसंती क्रमांक एक- गोकुळ गीते ‘ असा मजकूर असलेली बनावट मतपत्रिका प्रसृत झाली आणि महायुतीत प्रचंड खळबळ माजली. स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याने ही बाब तातडीने प्रदेश स्तरावरील नेत्यांच्या कानी घालण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने गणेश गीते यांच्याशी संपर्क साधून त्याविषयी चर्चा केली. त्यानंतर गीते बंधूंनी त्वरित प्रसार माध्यमांसमोर खुलासा करावा, अशी सूचना केली.
मजकूर खोडसाळपणाचा : गीते
गणेश गीते म्हणाले, ज्या दिवशी प्रचार थांबला, त्या दिवसापासून आम्ही निवडणुकीबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. इगतपुरीतील एका व्यक्तीने समाज माध्यमावर उपरोक्त मजकूर टाकून खोडसाळपणा केला आहे. ही बाब पुराव्यानिशी मी जगासमोर आणणार आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो आहोत. आमचा संपूर्ण पाठींबा नरेंद्र दराडे यांना आहे. केवळ आमची बदनामी करण्याच्या इराद्याने मजकूर टाकण्यात आला आहे. कोणीही गैरसमज करून न घेता महायुतीला मतदान करावे. गोकुळ गीते यांनीही या प्रकाराशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी लोकांच्या मनात काय चालले आहे, ते आम्ही कसे सांगणार, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.